संसदेच्या आवारात मंत्र्यांमध्ये चक्क हाणामारी थोडक्यात टळली !

संसदेच्या आवारात मंत्र्यांमध्ये चक्क हाणामारी थोडक्यात टळली !

दिल्ली – संसदेत घोषणाबाजी, गोंधळ घालणे हे हल्ली नित्याचच झालंय. मात्र या गोंधळानं आज एकदम टोक गाठलं. मोदी सरकारमधल्या दोन मंत्र्यांमध्ये अक्षरः हाणामारी होताहोता वाचली. शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या विमान  प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार आज आक्रमक झाले होते. संसदेत त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सरकार जाणून बुजन आमच्या खासदाराला त्रास देत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे गटनेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला. त्यानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शिवसेनचे खासदार आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्यात बैठक घेतली. या बैठकीतही शिवसेनेचे खासदार आणि गजपती राजू यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मुद्दामहून शिवेसनेच्या खासदाराला त्रास दिला जात असल्याचा आरोप अनंत गिते यांनी केला. तर गायकवाड हे विमान खासदार नाही तर प्रवासी होते. त्यामुळे कायदा सगळ्यांना सारखाच आहे असं उत्तर राजू यांनी दिलं. त्यावर भडकलेले गिते चक्क राजू यांच्या अंगावर धावून गेले. प्रसंगावधान राखत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांनी मध्यस्थी केली आणि दोघांनाही रोखलं. त्यामुळे संसद आवारात मोठा प्रसंग टळला.

COMMENTS