संसदेत कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला 6 महिने बंदी

संसदेत कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला 6 महिने बंदी

तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रिम कोर्टातने निकाल दिला आहे. तिहेरी तलाक प्रकरणी आदी संसदेत कायदा बनवा आणि कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला 6 महिने बंदी घालण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाचं सरन्यायाधीश जे.एस खेहेर यांनी दिला आहे. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

तिहेरी तलाक प्रकरणात केंद्र सरकारने सर्वाच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. तिहेरी तलाक पद्धतीला आम्ही वैध मानत नाही. ही परंपरा सुरू रहावी, असे आम्हाला वाटत नाही, अशी भूमिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली होते. या प्रकरणी सुरू असताना ऑल इंडिया मुस्लिम पसर्नला लॉ बोर्डाने याबद्दल काझींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असे सुप्रिम कोर्टाने सांगितले होते. आता सुप्रिम कोर्टाने संसदेत नवा कायदा बनवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आत संसदेत नवा कायदा होणार का ? याकडे पहावे लागणार आहे.

 

COMMENTS