सचिन-रेखा राजीनामा का देत नाहीत?

सचिन-रेखा राजीनामा का देत नाहीत?

समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांचा सवाल

 

बॉलीवूडची अभिनेत्री रेखा आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीबाबत अनेकदा टीका करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी ‘सचिन आणि रेखा यांना इंटरेस्ट नसेल, तर ते खासदारकीचा राजीनामा का देत नाहीत?’ असा थेट सवाल विचारला आहे.

 

संसदेचे हे अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेताना पाहिले नाही, असे अग्रवाल म्हणाले. हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे अग्रवाल यांनी हा प्रश्न मांडला. सचिन तेंडुलकर आणि रेखा सभागृहात हजर नाहीत याचा अर्थ त्यांना स्वारस्य नाही का आणि त्यांना स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा का, असा सवाल अग्रवाल यांनी केला. हा हरकतीचा मुद्दा नसल्याचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना उपस्थित राहण्यास तयार करा, असं राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी अग्रवाल यांना सुचवलं. त्यामुळे अग्रवाल यांनी गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना पत्र लिहून उपस्थित राहण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

 

 

COMMENTS