सत्ताधारी आमदारांचा लाल दिवा विरोधकांनी रोखला !

सत्ताधारी आमदारांचा लाल दिवा विरोधकांनी रोखला !

मुंबई – सत्ताधारी पक्षाच्या पक्षप्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देणारं विधेयक काल सरकारनं मागे घेतलं. विधान परिषदेत विरोधी पक्षांनी त्या विधेयकावर आक्षेप घेतला. त्या विधेयकामध्ये विरोधी पक्षाच्या पक्षप्रतोदांचाही समावेश करण्याची मागणी केली. त्यानंतर सरकारनं ते विधेयक मागे घेतले. त्याच्यामध्ये दुरूस्ती करुन ते आता पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं सत्ताधारी पक्षांच्या पक्षप्रतोदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देणारं विधेयक विधानसभेत मांडलं होतं. त्यामुळे शिवसेनेचे सुनिल प्रभू, निलम गो-हे आणि भाजपचे राज पुरोहित आणि भाई गिरकर यांना ला दिवा मिळण्यासाठी आता काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

COMMENTS