सदाभाऊ खोत आज जाणार चौकशी समितीला सामोरे

सदाभाऊ खोत आज जाणार चौकशी समितीला सामोरे

पुणे – कृषीराज्यमंत्री आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आज चौकशी समिती समोर हजर होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि खासदार राजु शेट्टी यांच्या जोरदार मतभेद झाले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नावरुन राजु शेट्टी सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. तर सदाभाऊ सरकारच्या बाजूने बोलत आहेत. शेतकरी आंदोलनात फूट पाडल्याचाही सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप आहे.

सदाभाऊ खोत यांनी या आधी (4 जुुलै) समितीच्या बैठकीला दांडी मारली होती. पुण्यात होणाऱ्या बैठकीला सदाभाऊंनी पाठ फिरवत मी एकादशीनिमित्त पंढपुरला आलो असून मला बैठकीला येणे अशक्य आहे. त्यामुळे ही बैठक पुढे घ्यावी अशी विनंती खोत यांनी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांच्याकडे केली होती. त्यामुळे आज 21 जुलै रोजी होणा-या समितीच्या बैठकीला सदाभाऊ येणार आहेत.  दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती नेमण्यात आली होती. आज  पुण्यात होणार या चौकशी समितीसमोर सदाभाऊ खोत आपली बाजू मांडतील.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धोरणाच्या विपरीत सदाभाऊ यांचे वागणे, संघटनेचे विचार, धोरणाच्या अगदी विरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे सदाभाऊ खोत  यांना  विचारणा केली जाणार असून.  आज सदाभाऊ खोत  हे चौकशीसमिती समोर आपली काय भूमिका मांडणार आहे. तसेच सदाभाऊ खोत यांची पक्षातून हकालपट्टी होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

COMMENTS