कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात आज आणखी एक शेतकरी संघटना अस्तित्वात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकेलले राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आज नवी संघटना स्थापन करत आहेत. रयत क्रांती संघटना असं या नव्या संघटनेचं नाव आहे. कोल्हापुरात आज एका शेतकरी मेळाव्यात या संघटनेची स्थापना होणार आहे. संंघटनेचं नाव जरी बदललं असलं तरी बिल्ला मात्र सारखाच ठेवण्यात आला आहे.
सदाभाऊ यांची नवी संघटनेचे कार्यकर्ते हे आरोग्यदूत, जलदुत, स्वच्छतादूत बनून कार्य करणार आहेत. जाती पाती विरहित आणि सर्व समावेशक अशी ही शेतकरी संघटना असेल असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय. शेतमजूर, कष्टकरी, कामगार, महिला आणि युवकांच्यासाठी झटणारी रयत क्रांती संघटना असेल असंही सदाभाऊ म्हणाले.
आजच्या शेतकरी मेळाव्याला कोण कोण हजेरी लावतं, कोण कोण सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत सामिल होते हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तसंच आजच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत कार्यर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, राजू शेट्टी यांच्यावर काय बोलतात याकडं सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS