समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांवर भूखंड लाटल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांवर भूखंड लाटल्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

भुजबळ परीवाराच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. या परिवारातील सदस्यांवर खोटी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन त्याआधारे भूखंड लाटल्या प्रकरणी आणखी एका गुन्ह्याची नोंद झालीये. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई एसीबीने फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलाय.

पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या भावेश प्रा.लि कंपनीनं ओशिवरा तुळशी को ऑप हौसिंग सोसायटी लि. ही संस्था तयार करुन त्या संस्थेच्या नावे भूखंड लाटण्यात आला असून, तुळशी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रशांत सावंत, सेक्रेटरी मुन्ना सय्यद, सभासद अजित वळुंज, तुकाराम पारकर, संजय पराडकर, तत्कालीन म्हाडा प्राधिकरणाचे सदस्य ताजुद्दीन मुजाहीद, यांनी साक्षिदारांची कागदपत्रे गैरमार्गाने मिळवली.

शासनाची फसवणुक केली म्हणून एकूण 17 जणांवर एसीबीने कलम 420, 409, 465, 466, 468, 471 सह 34, 109, 120 (ब) भा.द.वि. सह कलम 13(1) (क), 13(1)(ड) सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आता पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झालीये. एवढंच नाही तर एसीबीने या गृह निर्माण संस्था आणि 17 जणांच्या विविध कार्यालये आणि घरांवर देखील छापे टाकून ठोस पुरावे जप्त केले आहेत.

 

COMMENTS