समृद्धी महामार्गाचं काय होणार ? 10 जिल्ह्यातील शेतकरी आज पवारांकडे मांडणार गा-हाणे

समृद्धी महामार्गाचं काय होणार ? 10 जिल्ह्यातील शेतकरी आज पवारांकडे मांडणार गा-हाणे

औरंगाबाद – मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू केली आहे. मात्र शेतक-यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. मुंबईतून सुरू होणारा हा महामार्ग राज्यातील 10 जिल्ह्यातून जातो. त्या दहाही जिल्ह्यातील शेतक-यांनी या प्रकल्पाला  विरोध केला आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात सुपीक आणि बागायती जमिन जात आहे. इतरांच्या विकासासाठी, ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी आम्हाला भूमिहीन केले जात असल्याचा शेतक-यांचा आरोप आहे. सरकारला विरोध करुनही जमीन अधिग्रहण सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी  संतापलेले आहेत. सरकार सांगूणही ऐकत नसल्यामुळे या शेतक-यांनी आता शरद पवार यांच्याकडे गा-हाणे मांडण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादच्या जगतगुरू संत तुकाराम महाराज सभागृहात दुपारी 1 वाजता हे शेतकरी पवारांना भेटणार आहेत. शरद पवार या प्रकरणात आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS