समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच जमीन अधिग्रहणाला सुरूवात !

समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच जमीन अधिग्रहणाला सुरूवात !

राज्य सरकारच्या महत्वकांक्षी समृद्धी महामार्गाला विरोधी पक्षांसह शिवसेनेनं जोरदार विरोध केला आहे. अनेक सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा विरोध बोलून दाखवला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे नेते समृद्धी महामार्गासाठी पुढाकार घेत असल्याचं चित्र आहे. या महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाचा कार्यक्रम आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा इथं पार पडला. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी सहा शेतक-यांच्या जमीनी सरकारने अधिग्रहीत केल्या आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी साक्षीदार म्हणून कागदपत्रावर सहीही केली आहे.

COMMENTS