सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 3 लाख कोटींचे नुकसान –  पी. चिंदबरम

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 3 लाख कोटींचे नुकसान – पी. चिंदबरम

नोटबंदी आणि जीएसटीमुळे आर्थिक वर्षातील पहिल्याच तिमाहीतील विकासदर मागील तीन वर्षांत प्रथमच निचांकी पातळीवर आला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीडीपी 2 टक्क्यांनी घरसला असून, देशाचे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी म्हटले  आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून सरकारच्या धोरणांवर टीका केली.

आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत विकास दर  7.9 टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज सरकारने वर्तविला होता. मात्र, गेल्या तिमाहीपेक्षाही विकास दरात घट होऊन या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) दर 5.7 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

यावर चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरूच आहे. विकासदर मंदावला, गुंतवणूक कमी झाली आणि बेकारी वाढली. एक स्फोटक कॉकटेल तयार झाले आहे. मुळात जीडीपीमध्ये एक टक्क्याची घसरण म्हणजे 1 लाख 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान आता तर, जीडीपी 2 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशाचे एकूण 3  लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

COMMENTS