कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचे राजकीय पडसाद उमटत असले तरी राज्याचे कृषी राज्यमंत्री व एकेकाकळचे संघटनेचे शिलेदार सदाभाऊ खोत यांनी संघटनेचा निर्णय पूर्णपणे बेदखल केला आहे. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा पूर्णपणे व्यक्तिगत असल्याची केवळ एक ओळीची प्रतिक्रिया देऊन त्यांनी संघटनेच्या सरकारमधून बाहेर पडण्याला फार महत्त्व दिले नसल्याचे दिसत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर पडल्याची घोषणा आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी यापुढे लढा चालूच राहील असेही त्यांनी सांगितले. आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली.
COMMENTS