सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी गुड न्यूज !

सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी गुड न्यूज !

सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी गुड न्यूज आहे. पेंशनधारकांना मेडिकल बेनिफिटची एक योजना येणार आहे. पण पेंशनधारकांना एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड अर्थात ईपीएफचा मेंबर असचं आवश्यक असणार आहे.  ईपीएफ सदस्यांना आता वैद्यकीय सुविधा मिळू शकते. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली.

ते म्हणाले की, कर्मचारी राज्य बीमा निगम (ईएसआयसी)च्या संयुक्त विद्यमाने ईपीएफ सदस्यांसाठी वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहे.

या सुविधेसाठी ईपीएस 1995चं संपूर्ण मूल्यांकन करण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गत तब्बल ५९ लाख पेन्शनधारकांना फायदा होऊ शकतो. तसंच पेन्शन वाढून ती 1000 ते 3000 करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. याखेरीज ईपीएफ सदस्यांसाठी अन्यही काही सोयी पुरवण्यात येणार आहेत.

COMMENTS