सरकारी बँकांची उद्योगपतींवर खैरात, 5 वर्षांत एनपीए तब्बल 6 पटीने वाढला !

सरकारी बँकांची उद्योगपतींवर खैरात, 5 वर्षांत एनपीए तब्बल 6 पटीने वाढला !

दिल्ली – सरसकट सर्व सहकारी बँकांना वारंवार आरोपीच्या पिंज-यात उभं करणा-यांना आणि राष्ट्रीयकृत बँकांचं गुणगाण करणा-यांसाठी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. या सरकारी बँकांनी उद्योगपतींवर कर्जांची अक्षर खैरात केली असून त्यांच्याकडील एनपीए गेल्या पाच वर्षात तब्बल 6 पटीने वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यसभेत आज ही माहिती देण्यात आली. 2012 -13 मध्ये 62 हजार 449 कोटी असलेला एनपीए आता म्हणजे 2016-17 मध्ये  तब्बल 3 लाख 44 हजार 355 कोटींवर गेला आहे. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया या बँकांचा सर्वात जास्त एनपीए आहे. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी हे उत्तर दिले.

COMMENTS