सर्वसामान्य हिंदू, बौद्ध आणि मुस्लिमांना टार्गेट करु नका – अल् कायदा

सर्वसामान्य हिंदू, बौद्ध आणि मुस्लिमांना टार्गेट करु नका – अल् कायदा

अल कायदा या दहशतवादी संघटनेनं एक पत्रक जारी करुन भारतामध्ये कोणाला टार्गेट करायचं आहे याच्या सूचना दहशतवाद्यांना दिल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे. काश्मीरमध्ये कश्मिरी तरुणांना ठार मारणा-या लष्करी जवान आणि लष्करी अधिका-यांना टार्गेट करा. जास्तीत जास्त वरीष्ठ अधिका-यांना टार्गेट करा असंही त्यामध्ये सांगण्यात आलं आहे. तसंच भारतातील कट्टर हिंदूत्ववाद्यांनाही टार्गेट करा असंही त्यामध्ये सांगण्यात आलं आहे.  सर्वसामान्य हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिमांना मारु नका असंही त्या पत्रकार सांगण्यात आलं आहे. तसचं मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळांनाही लक्ष करु नका असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. अल कायदासमोर सध्या आयसिस या दहशतवादी संघटनेचं आव्हान आहे, त्यांनी धार्मिक स्थळांना लक्ष केलं आहे. त्यामुळेच अल कायदाने आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भारतासोबतच पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांमध्ये कोणाला टार्गेट करायचं याची माहितीही या पत्रकांमध्ये देण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्था याकडे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत अशी माहिती सूत्रानी दिली आहे.

COMMENTS