2014 च्या निवडणुकीत भरभरुन यश मिळवेल्या भाजपनं संपूर्ण देश पादाक्रांत करण्याठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी त्यांना यशही आलं आहे. मात्र अशी काही राज्य आहेत त्यामध्ये भाजपला आपले बस्तान बसवता आले नाही. पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजप विस्ताराला म्हणावे तेवढे यश आलेले नाही.
कर्नाटकामध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. त्याची मुदत पुढच्या वर्षी संपणार आहे. पुढच्यावेळीही कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सी फोर या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस पुन्हा स्वबळावर सत्तेववर येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्व्हे नुसार काँग्रेसला 120 ते 132 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 60 ते 72 जागा तर जेडीएसला 24 ते 30 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतरांना 1 ते 6 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मतांच्या टक्केवारीतही काँग्रेसनं भाजपवर मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला तब्बल 43 टक्के मते पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 32 टक्के तर जेडीएसला 17 टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही सर्व्हेमध्ये सर्वाधिक पसंती मिळीली आहे.
19 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत हा सर्व्हे करण्यात आला आहे. 165 विधानसभा क्षेत्रातील 24 हजार 679 जणांच्या मुलाखती या सर्व्हेसाठी घेण्यात आल्या आहेत.
COMMENTS