सर्व मालवाहतूकदारांचा देशव्यापी चक्काजाम आंदोलन

सर्व मालवाहतूकदारांचा देशव्यापी चक्काजाम आंदोलन

आज मध्यरात्रीपासून सर्व माल वाहतूक दारांकडून बेमुदत चक्काजाम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ट्रक-टँकर बस वाहतूक महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

सरकारकडून मध्यंतरी टोलदर वाढ तसेच वाहनांच्या इंशुरन्समध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली. या पार्श्वभुमीवर महासंघाची बैठक आज (शनिवारी) पार पडली. यावेळी वरील निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी वाहतुकदार उपस्थित होते.

 

दरम्यान, सरकाने टोल दरवाढ आणि इंन्शुरन्समध्ये करण्यात आलेल्या दरवाढीवर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा दूध टँकर व भाजी वाहतूक देखील बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS