मुंबई – सह्याद्री गेस्ट हाऊवर सरकारचा मंत्रिगट आणि शेतकरी सूकाण समितीच्या प्रतिनिधींची बैठक सुरू असून या बैठकीमध्ये मंत्रिगट आणि सूकाणू समितीचे प्रतिनिधी यांच्यात चांगलीच खडाडंगी झाली. शेतकरी संपादरम्यान शेतक-यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सुकाणू समितीमधील सदस्यांनी केली. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शेतक-यांवरील गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावर आमदार बच्चू कडू चांगलेच भडकले. आणि त्यांच्यात आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार तूतू मैमै सुरू झाली. त्यानंतर दोन्ही बाजुच्या इतर सदस्यांनी दोघांना शांत केलं आणि पुन्हा बैठकीत चर्चा सुरू झाली. या प्रश्नावर एकत्र बसून पुन्हा निर्णय घेऊ अशी तात्पुरता मध्यम मार्ग काढण्यात आला. आता सद्या बैठक सुरू असून आणखी काही वेळ बैठक सुरू राहणार आहे. बैठकीनंतर दोन्ही बाजू आपले म्हणणे माध्यमांसमोर मांडणार आहेत.
COMMENTS