सांगली : आ. मोहनराव कदम यांचा पुतळा दहन प्रकरणी काँग्रेसचा मोर्चा

सांगली : आ. मोहनराव कदम यांचा पुतळा दहन प्रकरणी काँग्रेसचा मोर्चा

सांगली – काँग्रेस आमदार मोहनराव कदम यांचा पुतळा दहन करणाऱ्यांनावर तत्काळ अटक करा या मागणीसाठी आज कडेगावमध्ये कॉंग्रेसने मोर्चा काढण्यात आला आहे. या मार्चात शेकडो लोक सहभागी झाले आहे.
सांगली जिल्हा बँकेत शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. यामध्ये संचालक असणाऱ्या काँग्रेस आ. मोहनराव कदम आणि भाजपचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात वाद निर्माण झाला. सांगलीच्या वसंत दादा पाटील शेतकरी साखर कारखाण्याच्या कर्जावरून हा वाद झाला होता. यामध्ये कदम यांनी झेडपी अध्यक्ष देशमुख यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत शनिवारी कडेगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदार यांच्या पुतळ्याचे दहन केले होते.

या प्रकारामुळे कडेगाव शहरात तणावपूर्ण परस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शहारत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS