सांगली – मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणांना केली मारहाण

सांगली – मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय तरुणांना केली मारहाण

सांगली – परप्रांतीय हटाव नारा देत मनसेने कुपवाडामध्ये परप्रांतीय कामगारांना भर रस्त्यात चोप दिला आहे.

कुपवाड आणि मिरज एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांची भरती करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप सांगलीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. या विरोधात संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत कुपवाड एमआयडीसीमधील परप्रांतीय कामगारांना चोप दिला.  याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या परप्रांतीयांना लक्ष्य करत पकडुन त्यांना मारहाण केली. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाची परस्थिती निर्माण झाली होती.

 

 

COMMENTS