सांगली – तासगावच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका निर्मला पाटील यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले असून. अवैध बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी ही कारवाई केली आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्कामानला जात आहे. निर्मला पाटील यांच्या अवैध बांधकामाबाबद भाजपचे अनिल कुत्ते यांनी जिल्हा आधिक-याकडे तक्रार केली होती. या तक्रारनंतर जिल्हाधिकारी यांनी निर्मला पाटील यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.
दरम्यान ही कारवाई राजकीय हेतूनेच झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून, या करवाई विरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करणार असल्याची राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष अमोल शिंदे यांनी म्हटले आहे.
COMMENTS