सातबारा कोरा होईपर्य़ंत आंदोलन सुरूच राहणार, 12 ला ठिय्या, 13 ला रेलरोको

सातबारा कोरा होईपर्य़ंत आंदोलन सुरूच राहणार, 12 ला ठिय्या, 13 ला रेलरोको

नाशिक – शेतक-यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतक-यांच्या नाशिकमध्ये झालेल्या सुकाणु समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 12 तारखेला राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त, 13 जूनला राज्यभर रेल रोको आणि रास्ता रोको करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ठिय्या आंदोलन आणि रेलरोकोसोबत मंत्र्यांनाही फिरू देणार नाही असा इशाराही बैठकीत देण्यात आला. तर तिस-या टप्प्यात मुख्य शहराची पुन्हा कोंडी करून सरकारला खाली खेचणार असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

स्टेजवर भाई जगताप आल्याने गोंधळ

सुकाणू समितीच्या बैठकीच्या ठिकाणी काँग्रेस नेते भाई जगताप उपस्थित झाल्याने शेतकऱ्यांनी  गोंधळ घातला. राजकीय पक्षाच्या नेत्यांना स्टेजवर स्थान नको अशी भूमिका शेतक-यांनी घेतली. त्यामुळे जगताप यांना स्टेजवर बसता आले ही. राजू शेट्टी यांनी शेतकर्यांची समजूत घालत, सरकार विरोधात लढण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत मिळेल त्यांची घ्यावी असं आवाहन शेतक-यांना केलं. तेंव्हा शेतकरी शांत झाले.

राजू शेट्टी, बच्चू कडू यांनाही स्थान नको –इनामदार

सुकाणू समितीच्या बैठकीत राजू शेटी, बच्चू कडू यांनाही  स्थान नको अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी घेतली. अचानक स्टेजवर जात त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उघाडा. त्यावेळी पोलिसांनी इनामदार यांना ताब्यात घेतलं.

COMMENTS