सातारा: कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या

सातारा: कर्जाला कंटाळून शेतकरी भावांची आत्महत्या

सातारा – कर्जाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याची घटना रात्री साताऱ्यातील वडगाव हवेली येथे घडली. विशेष म्हणजे हे दोघेही शेतकरी उच्चशिक्षित होते. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज काढले होते. पण बँकांचा कर्जवसूलीचा ताण सहन न झाल्याने, या दोघांनीही आत्महत्या केली.
कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील जगन्नाथ शिंदे आणि विजय शिंदे यांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी कराडमधील 2 बँकांकडून एकूण 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र शेती आणि व्यवसायातील तोट्यामुळे चव्हाण कुटुंब गेली अनेक दिवस अडचणीत होते. तसेच मार्च एन्डिंगमुळे कर्जवसूलीसाठी बँकेकडून तगादा वाढला होता. कर्ज वसूलीचा वाढता ताण सहन न झाल्याने विजय चव्हाण यांनी विद्यानगर कराड येथे विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना वडगाव येथे मोठे बंधू जगन्नाथ चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांनीही कराड ओगलेवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या केली.

 

COMMENTS