मुंबई – सायन-पनवेल महामार्गाच्या २००९ साली झालेल्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालंय. विधानसभेत मांडलेल्या लोकलेखा समितीच्या अहवालात हा पर्दाफाश करण्यात आलाय. रस्त्यासाठी राबविण्यात आलेल्या कार्यपद्धतीवर लोकलेखा समितीने ताशेरे ओढलेत. महामार्गाची जाडी, सव्र्हिस रोडची लांबी, संरक्षक भिंतीची उभारणी या सर्वच कामात अनियमितता आढळली आहे. याप्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करून कारवाईचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असे निर्देश लोकलेखा समितीने दिले आहेत.
Newer Post
नीतीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले खरे पण…… Older Post
रामदास कदम, पर्यावरणमंत्री
COMMENTS