सार्वजनिक ठिकाणी टायर जाळले तर होऊ शकते 6 वर्षाची शिक्षा !

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळले तर होऊ शकते 6 वर्षाची शिक्षा !

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणे आता तुम्हाला महागात पडू शकेल. कारण राष्ट्रीय हरित न्यायालयाने आता सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्याला बंदी घातली आहे. मात्र तरीही एखाद्याने टायर जाळले तर त्याला 1 ते 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते. आंदोलन करताना अनेक वेळा टायर जाळले जाते, मात्र यापुढे तुम्ही असे केले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. विषारी वायु पसरवणारे टायर जाळण्यावर ब़ंदी घालावी यासाठी अड. असीम सरोदे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर हरित न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. वीटभट्टी तसंच इतर ठिकाणी टायर इंधन म्हणून जाळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

COMMENTS