मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्धा तास श्रमदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्धा तास श्रमदान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील हलगरा येथे आज सकाळी शेतात जाऊन श्रमदान केले. जलयुक्त शिवार कामांना भेटी देऊन हलगरा गावातील शेत शिवारात मुख्यमंत्र्यांनी हे श्रमदान केले. हातात कुदळ, फावडे घेऊन कम्पार्टमेंट बंडिंगचे काम मुख्यमंत्र्यांनी स्वतः केले. यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूरचे खा.सुनील गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वतः बांधावर टोपल्याने मातीही टाकली. याशिवाय या ठिकाणी चालणाऱ्या कामाची पाहणीही केली. हलगरा गावात सुरु असलेल्या श्रमदानाने मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. तसेच हलगरा हे गाव दत्तक घेतलं. येत्या काळात शासनाच्या विविध योजना ते या गावात राबविणार आहेत. हलगरा नंतर मुख्यमंत्र्यांनी औराद शहाजनी येथील तेरणा नदीवरील खोलीकरण कामाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.

 

COMMENTS