शेतकऱयांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सुकाणू समितीमध्ये आज चर्चा होणार आहे. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र, गिरीधर पाटील यांच्या या चर्चेला नकार आहे. त्यामुळे सुकाणू समितीमध्ये मतभेद आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत डॉ.गिरधर पाटील, रामचंद्रबापू पाटील, अनिल घनवट, बुधाजीराव मुळिक आदी सदस्य अनुपस्थित राहणार आहेत. मात्र, गिरीधर पाटील यांचा या चर्चेला नकार आहे. त्यामुळे सुकाणू समितीतच मतभेद आहेत का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.
राजू शेट्टी, बच्चू कडू आणि इतर सदस्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि मंत्रिगटासोबतच्या चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र गिरीधर पाटील यांनी त्याला विरोध केला आहे. त्यामुळे आता चर्चा होणार की आणखी काही वाद सुरू होणार हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, वीजबिल माफी, दूधाच्या दरांमध्ये वाढ, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासह इतर मागण्या सुकाणू समितीने लावून धरल्या आहेत आणि त्यासाठी 12 जूनला सरकारी कार्यालयांना घेराव आणि 13 तारखेला रेलरोकोची घोषणा केली आहे.
COMMENTS