सुकाणू समितीच्यावतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन

सुकाणू समितीच्यावतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन

सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने दिलेली कर्जमाफी मान्य नसल्याने आज राज्यभरात सुकाणू समितीच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणाऱ्या एकाही मंत्र्याला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करू देणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे. काश्मिरात अकोल्याचे सुपूत्र सुमेध गवई यांना वीरमरण आल्याने सुकाणूचे अकोल्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी सुकाणू समितीच्या रास्ता रोको आंदोलनाला यवतमाळच्या शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्या निमित्त यवतमाळचे शेतकरी तालुकानिहाय आंदोलन करून महामार्ग अडवणार आहेत. समस्त जिल्ह्यातील ट्रॅफिक अडवण्याचा संकल्प जिल्हा शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने घेतला आहे.

COMMENTS