काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांना मंत्रिमंडळात येण्याची ऑफर दिली होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी ती फेटाळून लावली. शरद पवार यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात केला होता.
त्यावर सुप्रिया सुळे यांनी एनडीटीव्हीला स्पष्टीकरण दिले आहे. मोदी यांनी आपल्याला मंत्रिमंडळात येण्याची ऑफर कधीच दिली नाही असं सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचा दावा खोटा ठऱला आहे.
संजय राऊत यांनी नेमका काय केला होता दावा ?
काही दिवसांपूर्वी शरद पवारांना मी भेटलो होतो. त्यावेळी मी त्यांना विचारले की तुम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबत जाणार आहात का ? त्यावर पवार म्हणाले की काही दिवसांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेटलो होतो. तेंव्हा मोदी यांनी मला सुप्रीया सुळे या मंत्रीमंडळात हव्या आहेत. असं म्हटलं होतं. त्यावेळी सुप्रीया माझ्या शेजारीच होती. तिने मोदींना तोंडावर सांगितले की मी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मंत्रिमंडळात सामिल होणार नाही.
COMMENTS