मुंबई – राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई सध्या वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधील एमआयडीचीच्या जमीनीवरील हक्क काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. विधीमंडळाच्या शेवटच्या आठवड्यात यावरुन जोरदार गदारोळ झाला. त्यावर त्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्र्यांनीही त्यांची बाजू लावून धरली. मात्र मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांच्याप्रमाणे देसाई यांच्या चौकशीची विरोधकांची मागणी मान्य केली आहे.
आज सकाळी सुभाष देसाई मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि त्यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळे आणि मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीमुळे राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. मात्र मुख्यमंत्र्यानी तो स्वीकारला नाही. निष्पक्ष चौकशी होईल त्यामुळे राजीनामा देण्याची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर नैतिकतेच्या आधारावर आपण राजीनामा दिला असं देसाईंचं म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वी गोरगावमध्ये सुभाष देसाई यांच्या पंच्चाहत्तरीनिमित्त एक कार्यक्रम झाला होता. तिथे बोलताना आपल्याला आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे त्यांना त्या पदावर राहायचं नाही हे यावरु दिसतंय. त्यामुळे नैतिकतेच्या नावाखाली आपण आणि शिवसेना शहीद होऊ आणि त्याचा सकारात्मक परिणाम शिवसेनेवर होईल अशी त्यांची धारणा असवी म्हणूनच देसाई यांनी राजीनामा दिलेला असू शकतो.
देसाई यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे भाजवर दबाव टाकण्याचं काम केलं आहे. देसाई यांचा राजीनामा स्विकारला असता तर प्रकाश मेहता यांचाही राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला असता. त्यामुळे भाजपवर कुरघोडी करण्यासाठीच शिवेसनेनं हे राजीनामा अस्त्र वापरलं असण्याची शक्यता आहे. शिवसेनेला एवढीच जर नैतिकतेची चाढ असती तर राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. तेंव्हाही त्यांनी राजीनामा देण्याची तयारी का दाखवली नाही असा प्रश्न आहे.
COMMENTS