‘एमआयडीसी’च्या जमीन घोटाळ्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या जमीन प्रकरणावरुन विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या मागणीनंतर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्दही केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा फेटाळला होता. आता के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. बक्षी हे राज्याचे माजी अपर मुख्य सचिव आहेत. ही एक सदस्यीय समिती गेल्या 15 वर्षातले निर्णय तपासणार आहे.
COMMENTS