ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत असलेले पोस्टर शिवसेनेचे प्रवक्ता व नगरसेवक अरविंद भोसले यांनी वरळीत झळकवले होते आता, मात्र हे पोस्टर सेनेच्या आंगलट आलं आहे.
सोमवारी सकाळी वरळी येथे शिवसेना प्रवक्ता नगरसेवक अरविंद भोसले यांनी राणेंचा खालच्या पातळीत उल्लेख करत, कटआऊट लावला होता. अखेर शिवसेनेलाच उपरती झाली आणि मातोश्रीच्या आदेशानंतर हे बॅनर हटवण्यासाठी पालिकेतील शिवसेनेच्या एका नेत्याने पालिकेच्या परवाना विभागाला फोन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
या बॅनरवर, दसरा-दिवाळी अंक 2017 इच्छा माझी पुरी करा.. असे ठळकपणे लिहीत..आता नारोबा म्हणजे, (आय) ला फ स वून बापाला सलाम ! स्वत:चा भुजबळ होऊ नये यासाठी… अशा मजकुरासह भाजपलाही डिवचण्याचा प्रयत्न केला. यावरून पोस्टरवॉर भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती.
काही तासांतच पालिकेने बॅनर उतरवले. शिवाय भोसले यांच्याविरोधात महापालिकेच्या तक्रारीनंतर काल सायंकाळी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. विनापरवाना बॅनर लावणे व समाजामध्ये तेढ निर्माण करणे, यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या परवाना विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्यारने सांगितले.
COMMENTS