सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासाठी भव्य मोर्चा, अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची मागणी

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरासाठी भव्य मोर्चा, अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची मागणी

सोलापूर – सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने  रविवारी (27 ऑगस्ट ) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा भव्यदिव्य व्हावा यासाठी कृती समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. सोशल मीडियातून मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रासने या नामांतरला जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसने पक्षपातळीवर भूमिका जाहीर केलेली नसली तरी अनेक स्थानिक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. भाजपचे काही नेत्यांनी स्वपक्षावरच टीका करत या मोर्चाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या मोर्चा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS