स्टेट बँकेने तिच्या गृह कर्जावरील व्याज दर 0.25 टक्क्यापर्यंत कमी केला आहे. याचा लाभ बँकेचे 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना होणार आहे. तर 30 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांना 0.10 टक्केपर्यंत मिळाला आहे. यामुळे स्टेट बँकेच्या कर्जदारांची मासिक हप्त्यात लाखामागे 530 रुपयांची बचत होणार आहे.
नव्या दर कपातीची अंमलबजावणी तातडीने लागू होत आहे. बँकेने गेल्याच आठवड्यात तिच्या विविध मुदतीच्या ठेवींवरील दरही तब्बल अर्ध्या टक्क्यापर्यंत केले होते. स्टेट बँकेची ही दर कपात योजना मर्यादित कालावधीसाठी असून नवा वार्षिक 08.35 टक्के दर हा 31 जुलैपर्यंतच असेल.
COMMENTS