स्तन कॅन्सरची आगाऊ माहिती देणारी ब्रा !

स्तन कॅन्सरची आगाऊ माहिती देणारी ब्रा !

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, मेक्सिकोतील विद्यार्थ्याने एक विशिष्ट प्रकारची ब्रा तयार केली आहे. विद्यार्थीच्या दावा आहे की, या पासून ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षणे समजण्यास मदत होईल. या ब्रा चे नाव ‘ईवा ब्रा’ असे ठेवण्यात आले आहे. ज्युलियन रियोस कांटू  या 18 वर्षाच्या मुलांने या ब्रा ची निर्मिती केली असून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे स्तन कॅन्सरची आगाऊ माहिती यापासून मिळते.

ही ब्रा तयार करण्यासाठी ज्युलियनने आपल्या तीन मित्र मिळून एका कंपनीचे निर्मिती केली आहे. सध्या तरी या  ब्रा ची पुर्णपणे यशस्वी चाचणी झाली नाही. या चाचणीसाठी या तिन्ही विद्यार्थीना मोठ्या प्रमाणात पैसा उभा करावा लागला.या संशोधनासाठी ग्लोबल स्टूडेंट अॅन्ट्रप्रण्योर (युवा उद्योगपती) पुरस्कार मिळाला. त्यांची कंपनी ‘हिजा टेक्नॉलॉजी’ ने 20 हजार डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्षांनी देखील या ज्युलियनचे अभिनंदन केलं आहे.

कशी मिळते स्तन कॅन्सरची माहिती?

कॅन्सरयुक्त ट्यूमरमध्ये रक्त प्रवाह वाढल्यामुऴे त्वचाचे तापमान वाढते. ‘ईवा ब्रा’ ही बायोसेंसर तापमान नोंद करेल आणि एका अॅपच्या माध्यमाने जोडले असल्या कारणाने ज्यांनी ही ‘ईवा ब्रा’ घातली असेन त्यांना जे काही अंतर्गत बदल होतील त्यांचे संकेत मिळतील. यासाठी कमीतकमी आठवड्यातून किमान ही ब्रा  60 ते 90 मिनिटे घालणे आवश्यक आहे तेव्हाचं ही  ब्रा अचूक संकेत पाठवेल.

स्तन कॅन्सरची लक्षणे
1. स्तनात गाठ.
2. बोंडातून द्राव येणे.
3. अचानक स्तनाचा आकार वाढणे.
4. अचानक स्तन आकुंचन पावणे.
5. स्तन घट्ट होणे.
6. स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी
जूलियनला ही कल्पना कशी आली?

जूलियन 13 वर्षाचा होता तेव्हा त्याला या प्रकल्पाची कल्पना आली. जूलियनच्या आईचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरमुळेच झाला होता. जर प्राथमिक अवस्थेत या विषयी त्यांना समजलं असते तर  आईला वाचवता आले असते.

COMMENTS