स्त्रियांच्या चार अच्छे दिनावर लादला कर – शालिनी ठाकरे

स्त्रियांच्या चार अच्छे दिनावर लादला कर – शालिनी ठाकरे

मुंबई : शालिनी ठाकरे यांनी राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची भेट घेऊन सरकारच्या सॅनिटरी नॅपकिन्स विषयात बोलणे नाकारल्याच्या विरोधात त्यांना प्रातिनिधिक स्वरूपातील सॅनिटरी नॅपकिन देऊ केले. त्याचबरोबर सरकारने देशी बनावटीच्या सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी मागे घेण्याबाबत आणि त्याचबरोबर बचत गटांच्या व्यक्तिरिक्त इतर भारतीय बनावटीच्या उत्पादकनासुद्धा या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात यावे याकरिता निवेदन दिले. शालिनी ठाकरे यांनी सांगितले की, “महिलांच्या मासिक पाळीचे चार दिवस हे ‘अच्छे दिन’ आहेत व नकारात्मक नाही कारण हे दिवस मानवतेसाठी जीवन देतात.सरकार याच दिवसांवर कर लादत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. असचं एक निवेदन आम्ही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही दिले होते.  मनसेच्या शिष्टमंडळात दीपिका पवार,मीना बन्सल, आरती पवार,सुनीता चुरी,सुजाता शेट्टी आदींचा समावेश होता.

COMMENTS