नाशिक – नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान बंदुक घेऊन महापालिकेत आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, राहुल आरोटे हा नगरसेवक भागवत आरोटे यांचा भाऊ आहे. राहुल आरोटे कमरेला बंदुक लावून महापालिका परिसरात फिरत होता. इतकंच नाही तर स्थायी सदस्य निवडणुकीदरम्यान महापालिकेत बाऊन्सर्सच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत होता.
दरम्यान, स्थायी समितीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. सभागृहात चाललेल्या गोंधळातच स्थायी सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली. महापौर, उपमहापौरांपाठोपाठ स्थायी समितीवरही भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं. 16 पैकी 9 स्थायी समिती सदस्य भाजपचे निवडण्यात आले. त्यानंतर शिवसेना 4 काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे प्रत्येकी 1 अशा एकूण 16 सदस्यांची निवड करण्यात आली.
COMMENTS