महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील शेतकरी आंदोलनाचे लोण आता गुजरातमध्येही पसरल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा गुजरातच्या अमरेली येथे सोमवारी संध्याकाळी कार्यक्रम आयोजित केला होता.
गुजरातमधील अमरेली येथे स्मृती इराणी यांची सोमवार (दि.12) जाहीर सभा होती. यावेळी स्मृती इराणी व्यसपीठावर भाषण करत असताना एका शेतकऱ्याने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. या प्रकारानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. केतन कासवाल असे त्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेनंतर इराणी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, एका महिलेवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी पुरुषाला पाठवलं आहे. काँग्रेसची ही रणनीती चुकीची आहे. गुजरात मध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून आशा घटना घडू शकतात याचा मला अंदाज यापूर्वीच होता असे स्मृती इराणी यांनी म्हणाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासवाल याला घेऊन जात असताना स्मृती इराणी यांनी त्याला सोडून द्यायची विनंती केली होती. त्याला बांगड्या फेकू देत. मी याच बांगड्या त्याच्या बायकोला भेट देईन, असे इराणी यांनी म्हटले.
या घटनेमुळे देशभरात शेतकऱ्यांच्या भावना सरकारविरोधातील तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
COMMENTS