दिल्ली – स्वच्छतेच्या बाबतीत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी म्हणण्याची वेळ राज्यावर आली आहे. केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाहिल्यावर महाराष्ट्र चांगलाच पिछाडीवर गेल्याचं दिसून येतंय. पहिल्या 10 मध्ये फक्त नवी मुंबई या एकमेव शहराने स्थान पटकावले आहे. तर पहिल्या 100 स्वच्छ शहरांमध्ये राज्यातील फक्त 7 शहरांना स्थान मिळाले आहे. यात नवी मुंबई ,पुणे,बृह्न मुंबई,शिर्डी, पिंपरी –चिंचवड, चंद्रपूर,अंबरनाथ आदी शहरांचा समावेश आहे.
देशात स्वच्छ शहरांत महाराष्ट्र कुठे आहे ?
क्रमांक शहराचे नाव
8. नवी मुंबई
13. पुणे
29. बृह्न मुंबई
56. शिर्डी
72. पिंपरी – चिंचवड
76. चंद्रपूर
89. अंबरनाथ
115. सोलापूर
116. ठाणे
124. धुळे
130. मीरा- भाईंदर
137. नागपूर
139. वसई- विरार
141. इचलकरंजी
151. नाशिक
157. सातारा
158. कुळगाव – बदलापूर
162. जळगाव
170. पनवेल
177. कोल्हापूर
181. नंदुरबार
183. अहमगदनगर
192. नांदेड वाघाळा
207. उल्हासनगर
219. उस्मानाबाद
229. परभणी
230. यवतमाळ
231. अमरावती
234. कल्याण- डोंबिवली
237. सांगली- मिरज- कुपवाड
239. मालेगाव
240. उदगीर
287. वार्शी
296. अकोला
299. औरंगाबाद
302. बीड
311. अचलपूर
313. वर्धा
318. लातूर
343. गोंदिया
355. हिंगणघाट
368. जालना
392. भिंवडी- निजामपूर
433. भुसावळ
COMMENTS