भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर काल इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात लेख लिहून सरडून टीका केली होती. केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर यशवंत सिन्हा यांनी जोदरार टीका केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थकारणाला मोठा फटका बसल्याची टीका यशवंत सिन्हा यांनी केली होती. या दोन्ही निर्णयामुळे आधीच टीकेचे धनी झालेले मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले. यशवंत सिन्हांच्या टीकेवर प्रश्नांचा भडीमार झाल्याने राजनाथसिंह आणि रविशंकर प्रसाद यांची कशी भंभेरी उडाली हे काल सगळ्या देशाने पाहिले.
यशवंत सिंन्हाच्या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. यशवंत सिन्हा यांचे वक्तव्य हे अत्यंत योग्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आणखी एक नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे यशवंत सिन्हा यांनी योग्य वर्णण केले आहे आणि याच्यातून देशाचे कारभारी काही धडा घेतील अशी अपेक्षाही शुत्रघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी पक्षापेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे असे वक्तव्य केले होते. त्याच अर्थाने यशवंत सिन्हा यांच्या वक्तव्याकडे बघितले जाईल अशी अपेक्षाही शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
Hope, wish & pray that all those people who matter in our party ponder over what has been said by Mr. Yashwant Sinha…1>2
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) September 28, 2017
COMMENTS