स्वाभिमानी सत्तेत राहणार की बाहेर पडणार आज ठरणार

स्वाभिमानी सत्तेत राहणार की बाहेर पडणार आज ठरणार

पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत राहणार की बाहेर पडणार याच निर्णय आज होण्याची शक्याता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पुणे होणार असून या बैठकीमध्ये सत्तेत राहायचे का नाही, याबाबतची चर्चा होणार आहे.

“स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने खोत यांच्या चौकशीसाठी ज्येष्ठ कार्यकर्ते दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने खोत यांच्या संदर्भात काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर खोत यांनी 21 जुलैला या समितीपुढे उपस्थित राहात स्वतःची बाजू मांडली होती. त्यानंतर या समितीने 7 ऑगस्टला खोत यांची संघटनेमधून हकालपट्टी केली होती. संघटनेतून खोत यांची हकलपट्टी करण्याचा आल्याचा निर्णय सरकारला देखील कळविण्यात आला. ते संघटनेच्या वतीने मंत्रीपदावर बसले आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करणारे पत्र संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यावर अध्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्र सरकार पुढील महिन्यात मंत्रीपदाचा विस्तार करणार आहे. त्यानंतर सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली, असा आरोप होवू शकतो. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय लवकर जाहीर करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे, यासर्व पार्श्‍वभूमीवर आज होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सत्तेमधून बाहेर पडायचे का नाही, यामुद्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

COMMENTS