कोल्हापूर – हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धैर्यशील माने यांनी केली आहे. कुठल्या पक्षातून निवडणूक लढवायची या बाबत अजून निर्णय झालेला नाही. तो योग्यवेळी घेऊ असं सांगत यावेळी आपण लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धैर्यशील माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा निवेदीता माने यांचे चिरंजीव आहेत.
माने गटाला कोणतही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय मिळालेली नाही. बाळासाहेब माने यांनीही संघर्ष करत अनेक निवडणुका जिंकल्या त्यानंतर निवेदीता माने यांनाही खूप संघर्ष करावा लागला. मलाही आता तसाच संघर्ष करावा लागणार आहे. पण मी त्याची तयारी केली आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सीट सोडली. आम्हाला त्यावेळी पक्षाने काही आश्वासने दिली होती. ती पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घ्यायचा ते घेईल पण आपण लोकसभा निवढणूक लढवणार असंही माने यांनी स्पष्ट केलं.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एनडीए सोडलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादाकडून हातकणंगलेची जागा कदाचित शेट्टी यांच्यासाठी सोडली जाऊ शकते. त्यातच निवेदीता माने या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर धर्य़शील माने यांच्या वक्तव्याला महत्व आलं आहे.
COMMENTS