हायकोर्टाच्या देखरेखीखाली गंगाखेड साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा तपास सुरू – केसरकर

हायकोर्टाच्या देखरेखीखाली गंगाखेड साखर कारखान्याच्या घोटाळ्याचा तपास सुरू – केसरकर

मुंबई – परभणी जिल्ह्यातील गंगाखेड साखर कारखाना घोटाळा प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. हा तपास हायकोर्टाच्या देखरेखेखाली सुरू असल्याचीही त्यांनी सांगितलं.

या प्रकरणातल्या गुन्ह्याचे स्वरुप व्यापक आहे, बँकांचीही चौकशी करणार असून दोषी बँक अधिका-यांविरोधात कारवाई करणार असल्याचही केसरकर यांनी  सांगितलं. यासंदर्भात एका लक्षवेधीला उत्तर देताना केसरकर यांनी ही माहिती दिली.

COMMENTS