नवी दिल्ली – डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम यांना उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राज्यात हिंसाचार उफाळून आला यामुळे मुख्यमंत्री मनोहर लाला खट्टर यांची खर्ची धोक्यात आली होती. मात्र सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, खट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही, यासोबतच पक्षाकडून त्यांच्याकडे स्पष्टीकरणदेखील मागितले जाणार नाही.
हरियाणातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाहांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला हरयाणाचे प्रभारी अनिल जैन, कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते. या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा घेण्याचा विचार सध्या तरी पक्षाच्या नेतृत्वकडून करण्यात आलेला नाही. याशिवाय खट्टर यांना दिल्लीत बोलावून त्यांना समज दिली जाणार असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचेदेखील भाजपाकडून सांगण्यात आले आहे.
COMMENTS