सिंधुदुर्ग – ‘हुसेन दलवाई यांचा सिंधुदुर्ग काँग्रेसशी काय संबध ?’ असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उपस्थितीत केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांचा निषेध केला आहे. आम्ही काँग्रेसमध्ये असताना ते कशी काय बैठक आयोजित करू शकतात, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. कणकवली ओसरगाव येथे पत्रकारांशी राणे यांनी संवाद साधला.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजप प्रवेश करणार, या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. त्यातच आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि काँग्रेस अंतर्गत निवडणुका असल्याने प्रदेश काँग्रेसने हुसेन दलवाई यांच्यासह चार नेत्यांना सिंधुदुर्गात पाठविले होते. या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. मात्र त्याच वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी जिल्हा कार्यकारिणीची बैठक कणकवली येथील ओसरगाव याठिकाणी आयोजित केली. त्यामुळे एकाचवेळी काँग्रेसच्या दोन बैठका आयोजित केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकांकडे लागून होते. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी हुसेन दलवाई यांच्या बैठकीकडे पाठ फिरवत राणेंच्या बैठकीकडे गर्दी केली. त्यामुळे हुसेन दलवाई यांना ठरल्या वेळची बैठक रद्द करत दुपारनंतर आयोजित करावी लागली. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी हुसेन दलवाई यांचा सिंधुदुर्ग काँग्रेसशी काय संबध, असा सवाल केला. आपली बैठक चार दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षांनी आयोजित केली होती. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये फूट पडण्याचं प्रयत्न करायला आलात का? अशोक चव्हाण घाणेरडे राजकारण करत असतील का ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थितीत केला आहे.
COMMENTS