‘हे’ असतील मंत्रिमंडळातील नवे चेहरे !

‘हे’ असतील मंत्रिमंडळातील नवे चेहरे !

नवी दिल्ली –  केंद्रीय मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार रिक्त झालेल्या जागांवर नव्या चेहऱ्यांची वर्णी लागणार आहे. येत्या रविवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

या नव्या मंत्र्यांमध्ये जेडीयूचे आर पी सिंह , संतोष कुशवाह आणि भाजपचे ओम माथूर ( युपी चे प्रदेशअध्यक्ष), भूपेंद्र यादव (हरियाणा), सत्यपाल सिंह (युपी, बागपत), प्रल्हाद जोशी (कर्नाटक), अश्वीनी चौबे (बिहार), हेमंत बीस्वा शर्मा (आसाम), हरिश द्विवेदी (युपी), सुरेश आंगडी (कर्नाटक, बेळगांव. लिंगायत) आदी नवे चेहरे असतील.

मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील पाच केंद्रीय मंत्र्यांनी आपल्यामंत्रीपदाचे राजीनामे दिले आहेत. त्यात कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी आणि जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानमंत्री उमा भारती,  जलसंपदा राज्यमंत्री संजीव बलयान आणि फग्गन सिंग कुलस्ते,  कलराज मिश्र, महेंद्रनाथ पांडे (युपी भाजप अध्यक्ष म्हणून जाणार) यांचा समावेश आहे.

COMMENTS