एकीकडे मोठ्या उद्योगपतींच्या हजारो कोटीच्या कर्जाकडे डोळेझाक करणारे भाजपा नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी बाबत नकार देते, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला,शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांवतीने चांदा ते बांदा काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान चांदुर रेल्वे येथे आयोजित सभे दरम्यान ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी आता पेटून उठण्याची गरज आहे, गोंधळलेले केंद्र व राज्य सरकार चुकीचे निर्णय घेत असून त्याला विरोध करताना आम्ही सर्व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून सर्व सामान्य नागरिकांच्या हिताकरिता लढा देत आहे,पीकविमाच्या रकमेतून कर्ज कपात करणार नाही हा सरकार ने काढलेला निर्णय हे संघर्ष यात्रेचे यश असल्याचे चव्हाण म्हणाले, निवडणूक काळात पंतप्रधान मोदी व भाजपने दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला, स्वामिनाथन आयोग लागू करून शेत मालाला भाव देऊ असे सांगणारे मोदी आज कोणता भाव देत आहे असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केला.
COMMENTS