1 एप्रिल रोजी संप न करण्याचा अंगणवाडी सेविका संघटनाचा निर्णय

1 एप्रिल रोजी संप न करण्याचा अंगणवाडी सेविका संघटनाचा निर्णय

महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची यशस्वी चर्चा  

 

1 एप्रिल रोजी अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी करण्यात येणारा संप महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी  सकारात्मक भुमिका घेतल्यांने सर्व संघटनांनी संप न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

आज विधानसभवनातील मंत्री मुंडे यांच्या दालनात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या या बैठकीत आमदार निलमताई गो-हे, आमदार विद्याताई चव्हाण, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढिसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच वित्त विभागाकडे पाठपुरावा केला जाईल व प्रस्ताव जसा येईल त्यास सकारात्मक करूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS