1 जुलै रोजी ‘राज्य मतदार दिवस’ साजरा केला जाणार

1 जुलै रोजी ‘राज्य मतदार दिवस’ साजरा केला जाणार

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या धर्तीवर यापुढे 1 जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या धरर्तीवर राज्यामध्येही मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत “स्वीप” (Systematic Voters Education and Electoral Participation) कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून मतदारांबरोबर संपर्क साधून मतदारांना लोकशाहीचे महत्व पटवून जागृत करण्यासाठी “राज्य मतदार दिवस” साजरा करण्यात येत आहे. असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

COMMENTS