लातूरकरांची मागणी अमान्य, बिदर- मुंबई नव्या एक्सप्रेसची घोषणा

लातूरकरांची मागणी अमान्य, बिदर- मुंबई नव्या एक्सप्रेसची घोषणा

सध्याची लातूर-मुंबई एक्स्प्रेस ही लातूरपर्यंतच ठेवण्याची जी मूळ मागणी होती ती मान्य झालेली नाहीच. शिवाय 1 जुलैपासून बिदर- मुंबई एक्सप्रेस या नव्या रेल्वेला मंजुरी देण्यात आली आहे.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. त्याआधी लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. या वादानंतर आता बिदर-मुंबई अशी नवी रेल्वे 1 जुलैपासून सुरु होणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असून, लातूर,उस्मानाबाद, बिदर या तीनही भागांना समान कोटा राहणार आहे. शिवाय यशवंतपूर ते बिदर जाणारी रेल्वे लातूरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

यापूर्वी ही रेल्वे आठवड्यातून 3 दिवस धावणार होती, मात्र ती रेल्वे बिदर नव्हे तर लातूरपर्यंतच असावी अशी मागणी करत लातूरकरांनी आंदोलन केलं होतं. पण आता तीच रेल्वे आठवड्यातून तीन दिवस नव्हे तर दररोज धावणार आहे.

 

 

COMMENTS