नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याबाबत सरकारकडून जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रासह 11 राज्यात या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. तसेच याबाबत अमित शाह यांनी आज लॉ कमिशनला पत्र देखील लिहिलं आहे. एकत्र निवडणुका घेणं देशाच्या संघीय स्वरपाविरोधात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. परंतु हा आरोप आधारहिन असून एकत्र निवडणुका घेतल्या तर संघीय स्वरुप आणखी बळकट होईल असं अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी घटनादुरुस्तीची गरज नसून यासाठी निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकमत होणं गरजेचं आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील 11 राज्यांमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेतली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS